मराठी सुविचार खजिना

या सुंदर मराठी सुविचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करा तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल एकदा नक्की वाचा आणि whatsapp वर आपल्या मित्रांना share करा

सुविचार यादी


सुविचार 1 :

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…समुद्र गाठायचा असेल…,तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!तुमचा दिवस शुभ जावो


सुविचार 2:

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.


सुविचार 3:

जीवनात आपला सल्लागार कोण आहे…..हे फार महत्वाचे आहे….पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा….


सुविचार 4:

सुंदर क्षणांची वाट पहाण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा


सुविचार 5:

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.


सुविचार 6:

आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही.  म्हणून नेहमी आनंदी राहा


सुविचार 7:

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.


सुविचार 8:

कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.


सुविचार 9:

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्…भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत


सुविचार 10:

बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक एवडा आहे कि वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस…


सुविचार 11:

संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं…    कारण माणूस त्या काळात एकटाच असतो.

यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.


सुविचार 12:

“दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेल सुख पण डोळ्यांना

दिसत नाही.!


सुविचार 13:

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.


सुविचार 14:

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते  कारण   उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची …


सुविचार 15:

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.


सुविचार 17:

कुणाच्या चांगुल पनाचा  फायदा एवढा घेऊ नका  की तो  वाइट मार्गाचा अवलंब करेल


सुविचार 18:

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.


सुविचार 19:

“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”


सुविचार 20:

“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”


सुविचार 21:

“छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने..मोठी मोठी नाती उध्वस्थ होतात..


सुविचार 22:

 विचार “असे मांडा की तुमच्या विचारावर कोणितरी ” विचार “केलाच पाहिजे….


सुविचार 23:

पुन्हा जिंकायची तयारी तिथुनच करायची जीथे हारण्याची जास्त भीती वाटत असते


सुविचार 24:

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.


सुविचार 25:

जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते….श्वास संपला तर जीवन संपते…

विश्वास संपला तर संबंध संपतात…..


सुविचार 26:

#ज्यांची_ सुरवात _शुन्यातुन_ होते, त्यांना _हारण्याची _भिती _नसते


सुविचार 27:

वागा असे कि कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगा असे कि कोणी त्रास नाही दिला पाहिजे…!!


सुविचार 28:

कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांनी केलेली स्तुती, ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते…


सुविचार 29:

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.


सुविचार 30:

कधी_कधी आयुष्याचे काही खेळ_जिंकून पण हरावे लागतात……एखाद्याच्या आनंदासाठी…


Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...