50+ Anmol Suvichar Marathi | अनमोल सुविचार मराठी

Anmol Suvichar Marathi | अनमोल सुविचार मराठी

हक्क आणि कर्तव्य
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत..


आयुष्यात असं काहीतरी मिळवा,
जे तुमच्या पासून कुणीही
चोरून घेऊ शकत नाही..


बदलण्याची संधी नेहमी असते,
पण बदलण्यासाठी
तूम्ही वेळ काढला का ?


कलेशिवाय जीवन
म्हणजे
सुगंधाशिवाय फूल
आणि
प्राणाशिवाय शरीर..


टाकीचे घाव सोसल्याशिवाय,
देवपण मिळत नाही..


Anmol Suvichar in Marathi | अनमोल सुविचार इन मराठी

प्रत्येक बाबतीत
दुसऱ्याचं
अनुकरण करु नका,
स्वतःची वेगळी
ओळख निर्माण करा..


स्वातंत्र्य म्हणजे संयम,
स्वैराचार नव्हे..


आयुष्यातला खरा आंनद,
भावनेच्या ओलाव्यात असतो..


माणसाने आपल्या आयुष्यात
सुख-दुःख, मानापमान,
स्फूर्ती-निंदा,
लाभ हानी, प्रिय-अप्रिय
ह्या गोष्टी समान समजाव्यात..


जीवनातील प्रत्येक क्षणी
शिकणं म्हणजे शिक्षण..


Anmol Suvichar Marathi For Students | अनमोल सुविचार मराठी फॉर स्टुडंट्स

तन्मयता नसेल तर,
विद्वत्ता व्यर्थ आहे.


शिक्षण हे साधन आहे,
साध्य नव्हे..


हसा, खेळा पण
शिस्त पाळा..


नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका..


यश न मिळणे
याचा अर्थ,
अपयशी होणे असा नाही..


Anmol Suvichar Marathi For WhatsApp | अनमोल सुविचार मराठी फॉर व्हाट्सअँप

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते,
ह्रदय हरतं पण
बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील
जिंकलेलं असतं..


खरं आणि खोटं यात केवळ
चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि
डोळ्यांनी पाहतो ते खरं..


जगी सर्व सुखी असा कोन आहे,
विचारी मना तुच शोधूनी पाहे..


आयुष्यात
काय गमावलंत ह्यापेक्षा,
काय कमावलंत ह्याचा विचार करा..


स्वतः जगा
आणि दुसऱ्यालाही
जगू द्या..


Anmol Suvichar Marathi Sms | अनमोल सुविचार मराठी एसएमएस

काळ्याकुट्ट रात्रीनंतर
उद्याची लख्ख पहाट असतेच..


काळजाची प्रत्येक जखम भरून येते,
कारण काळ दुःखावर
मायेची फुंकर घालत असतो..


एक साधा विचारसुध्दा तुमचं
आयुष्य उजळवू शकतो म्हणून,
नेहमी नवे विचार मिळवत रहा.


हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!


उगवणारा प्रत्येक दिवस
उमलणारा हवा.


Anmol Suvichar Marathi Short | अनमोल सुविचार मराठी शॉर्ट

या जन्मावर,
या जगण्यावर शतदा प्रेम करावे..


तुम्हाला मोठेपणी कोणं
व्हायचंय ते आजच ठरवा.. आत्ताच!


दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही,
मन मोठं लागतं..


माणूस म्हणजे गुण व दोष यांचे
मिश्रण आहे..


प्रत्येक क्षण
अपल्याला काही ना काही
शिकवत असतो..


Best Anmol Suvichar Marathi | बेस्ट अनमोल सुविचार मराठी

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे
सामर्थ्य प्रभावी होते..


काट्याविना गुलाबाचा
कोमलपणा व्यर्थ असतो..


दुःख हे कधीच
दागिन्यासारखं मिरवू नका,
वाटू शकलात तर
आपला आनंद वाटा..


शक्तीचा उपयोग नेहमी
शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती
वाया घालवू नका..


जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते..


Morning Anmol Suvichar Marathi | मॉर्निंग अनमोल सुविचार मराठी

दुःख हे बैलालासुध्दा
कोकिळेसारखं गायला लावतं..


शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही,
तो स्वतःहून शिकतो..


जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही,
ते सद्विचाराने चालते..


परिस्थितिला
शरण न जाता
परिस्थितीवर मात करा..


ऎकावे जनाचे
करावे मनाचे..


Anmol Suvichar Marathi Status | अनमोल सुविचार मराठी स्टेटस

एका वेळी एकच काम
आणि तेही एकाग्रतेने करा..


केवळ ज्ञान असून
उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं
याचंही ज्ञान हवं..


बाह्यशत्रूपेक्षा,
बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच
अधीक भीती असते..


चिंता
ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही..


तलवारीच्या जोरावर
मिळवलेलं राज्य,
तलवार असेतोवरच टिकतं..


Small Anmol Suvichar Marathi | स्मॉल अनमोल सुविचार मराठी

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय..


स्वातंत्र्य हा आपला
जन्मसिध्द हक्क आहे,
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे..


स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा
विकास खुंटला..


त्रासाशिवाय विद्या मिळणे
अशक्य आहे.
नव्हे, त्रास कसा सहन करायचा
हे शिकणे हीच विद्या..


मरावे परी
कीर्तीरूपे उरावे..