50+ Changle Vichar Marathi | चांगले विचार मराठी

Changle Vichar Marathi | चांगले विचार मराठी

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात
ते असामान्य..


अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते
मार्गस्थ दगड आहेत..


आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत ?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं..


कठीण किंवा महान
प्रसंगांना तोंड देता येईल,
असे गुण ज्या माणसाजवळ असतात
तो मनुष्य महान होतो..


खरा आनंद सुखसोयीमुळे,
संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,
तर आपल्या हातून काही लक्षात
ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो..


Changle Vichar Marathi Status | चांगले विचार मराठी स्टेटस

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो..


ज्याला खरोखरच
लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक
गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे…


तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा,
स्वप्ने जरूर खरी होतात..


दु:ख विभागल्याने कमी होते
आणि सुख विभागल्याने वाढते..


जो स्वत: दु:खातून गेला नाही,
त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?


Changle Vichar Status | चांगले विचार स्टेटस

जीवन जगण्याची कला ही
सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे..


जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे
श्रध्देचे क्षेत्र सुरू होते..


जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व
दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम
दुसरे कोणतेही नाही..


शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.


चांगल्या परंपरा निर्माण करणे
फार कठीण असते,
म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका..


Changle Vichar Status Marathi | चांगले विचार स्टेटस मराठी

जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी
वाईट दिवसांशी लढावे लागते..
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही..


पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं,
म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही…
अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे..


मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं
भरतीचा माज नाही अन्
ओहोटीची लाज नाही तरीही अथांग..


आयुष्यात अडचणी येत असल्यास
दुखी होऊ नका
कारण कठोर भूमिका फक्त
चांगला कलाकारांनाच दिल्या जातात..


चेहरा कितीही सुंदर असेना
जर जीभ कडू असली
तर लोक तोंड फिरवून घेतात..


हातावरील रेषापेक्षा
कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास
कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही..


Changle Vichar Marathi Good Night | चांगले विचार मराठी गुड नाईट

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका..”
✍🏻 शुभ रात्री ✍🏻


चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो,
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास.
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं..
“जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल,
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल..
🙏 Good night 🙏


कृपया लक्ष द्या..
स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो..
♥ !! शुभ रात्री !! ♥


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे..
मिस यू.. गुड नाइट 🙏


चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपून जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुला उठवण्यासाठी..
🌺 शुभ रात्री 🌺


Changle Vichar Marathi Sms | चांगले विचार मराठी एसएमएस

जर काही कार्य चांगले असतील
तर त्याला लगेच सुरु करा,
आणि लोकांबद्दल विचार करू नका.
कारण कमी तर देवा मध्ये सुद्धा काढतात,
तर तुम्ही काय चीज आहात..


जास्त विचार करण्याच्या जागी
जास्त करण्यावर विश्वास ठेवा,
जास्त करण्याच्या जागी
बरोबर करण्यावर विश्वास ठेवा,
आणि बरोबर करण्याच्या जागी
चांगला विचार सुद्धा करावं लागेल..


चांगलं बघाल तर चांगलं परत येईल,
वाईट बघाल तर वाईट परत येईल,
गोड बोलाल तर गोड बोल दुसऱ्यांच्या तोंडाने ऐकाल,
कडू बोलाल तर खोटं ऐकाल,
कारण आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं..


लोकं बोलतात नेहमी व्यस्त रहा.
चांगली गोष्ट आहे,
पण फक्त व्यस्त राहणं मोठं नाही,
महत्वपूर्ण ते आहे कि तुम्ही
कधी आणि कुठल्या कामात व्यस्त राहतां..


जीवनात फक्त यशासाठी
कठीण परिश्रम गरजेचं नाही
परंतु हे पण गरजेचं आहे की
कठीण परिश्रम कुठल्या दिशेने
केलं जात आहे
योग्य दिशेने कठीण परिश्रम करणं गरजेचं आहे..


Changle Vichar Sms Marathi | चांगले विचार एसएमएस मराठी

जशी भीती तुमच्या जवळ येईल,
त्याच्यावर आक्रमण करा
त्याला नष्ट करून टाका..


एका वेळे ला एकच काम करा,
आणि असं करताना तुमची पूर्ण आत्मा
त्यात टाका आणि बाकी सगळं विसरून जा..


विचार करायचं काम
सगळ्यात जास्त एकटेपणात होतो..


मी असा विचार करत नाही कि
लोकं मला पसंद करतील,
मला वाटतं कि लोकं माझा आदर करतील..


सगळ्यात मोठा गुरु ठोकर आहे
जेवढे खात जाल तेवढे शिकत जाल..


Changle Vichar Marathi New | चांगले विचार मराठी न्यू

छोट्या मनाने कोणी
मोठा होत नाही,
तुटलेल्या मनाने कोणी
उभा राहत नाही..


चांगली पुस्तके आणि चांगले लोक
लगेच समजून येत नाही त्यां
ना तुम्हाला वाचावं लागतो..


ज्यांच्या मध्ये
एकटं चालायची हिंमत असते,
एक दिवस त्यांच्या मागे
आख्ख जग असतं..


मित्रांनो जर तुम्ही
मोठं काही काम करत असाल,
तर तुमच्या कडे
संयम असणं खूप गरजेचं आहे..


आयुष्यात #RISK घायला घाबरू नका,
एक तर विजय होईल नाहीतर
अनुभव मिळेल..


Khup Changle Vichar | खुप चांगले विचार

“सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे
जसा सूर्य झाकला जात नाही
तसेच सत्यदेखील झाकले जात नाही..”


“सोने की पितळ हे
कसोटीच्या दगडावर ठरत,
सरलता नि कपटाची पारख
परमेश्वरापाशी होत असते..”


“धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.”


“जो स्वत:ला न जाणता
दुस-याला ओळखायला निघतो,
तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो..”


“माणसाचा व्यवहारचं विशाल झाला की,
परमार्थाचे रूप धारण करीत असतो..”


Life Changle Vichar | लाईफ चांगले विचार

जगण्याच्या इच्छेत
मरणाचे बीज आहे..


जी माणसं रागवतात
ती नेहमी खरी असतात,
कारण खोटाडयाना
मी नेहमी हसताना पाहिले आहे..


प्रेम एक आदर्श गोष्ट आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे..


वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं,
आपण कितीही सरळ असलो तरी
वळणावरून वळवाच लागतं..


संस्कृती म्हणजे
आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव..