50+ Suvichar in Marathi | मराठी सुविचार

Suvichar in Marathi Text | सुविचार इन मराठी टेक्स्ट

“जीवनात कधी कुणाला कमी समजू नका,
कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र
तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही..”


“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे व्यक्तीमत्व..”


जगात 7 अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत,
त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का?


“परिस्थितीच्या हातातली
कधीच कठ पुतळी बनू नका
कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद
तुमच्यात आहे..”


“ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने
मागे जाण्याचा विचार कधीही करु
नका, कारण तुम्हाला परत
जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे,
तेव्हढ्याच अंतरावर
तुमचे उद्दिष्ट आहे..”


Suvichar in Marathi for School | सुविचार इन मराठी फोर स्कूल

कमकुवत लोक बदला घेतात,
शक्तिशाली लोक माफ करतात
तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष्य करतात..


तुमचं आयुष्य हे मर्यादित आहे,
कुना दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात ते व्यर्थ घालवू नका..


यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे आहे
त्यामध्ये सुरवात करावी लागते..
आपली तयारी पूर्ण नसेल,
संसाधने मर्यादित असतील पण
वाट बघत बसण्यापेक्षा सुरु करणे कधीही चांगले..


जेव्हापर्यंत शिक्षणाचा हेतू हा
नोकरी मिळवणे असेल
तोपर्यंत देशात नोकरच जन्माला येतील,
मालक नाही..


सफल मनुष्य तोच आहे
जो आपल्या दुश्मनांवर नाही
तर आपल्या इच्छावर विजय मिळवतो..


Suvichar in Marathi for Students | सुविचार इन मराठी फोर स्टूडेंट

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही,
कारण ज्याच्यात हिम्मत, त्यालाच जगात किंमत..


प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचे अनुकरण करण्यापेक्षा
स्वतःची ओळख निर्माण करा..


ध्येयावर पोहोचता न येणे ही
शोकांतिका नाही,
तर पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे..


प्लॅन असलेला मूर्ख हा
प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो..


जो पर्यँत तुमच्यावर
कोणी तरी जळत नाही,
तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहात
हे कळत नाही..


Suvichar in Marathi Small | सुविचार इन मराठी स्मॉल

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका,
त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा..


एकावेळी खूप गोष्टींचा
विचार करत बसू नका,
सुरुवात लहान करा
पण स्वप्न मोठे ठेवा..


उघडून वाचल्याशिवाय
पुस्तक कळत नाही,
आणि समजून घेतल्याशिवाय
माणूस कळत नाही..


स्वप्ना शिवाय जीवन हे
अर्थ नसलेले जीवन आहे..


दुसऱ्याच्या राजवाड्यात
गुलामी करण्यापेक्षा,
स्वतःच्या झोपडीत
राज्य केलेले कधीही चांगले..


Suvichar in Marathi Short | सुविचार इन मराठी शॉर्ट

“स्वतः चा विकास करा,
ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत..”
–  स्वामी विवेकानंद


शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


“आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील
तोच आपला खरा मित्र होय..”
 -अब्राहम लिंकन


” एक गर्विष्ठ व्यक्तीच सर्वात संशयवादी असते.. “
-प्रेमचंद


“व्यक्तींना चिरडून,
ते विचारांना मारू शकत नाहीत..”
– भगत सिंह


Suvichar in Marathi Good Morning | सुविचार इन मराठी गुड मॉर्निंग

मोर नाचताना सुद्धा रडतो,
आणि राजहंस मरताना सुद्धा गातो,
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही..
यालाच जीवन म्हणतात..
🍁 शुभ सकाळ 🍁


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात..
🌷 शुभ सकाळ 🌷


आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही..
🌷 शुभ सकाळ 🌷


विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत,
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे..
🌷 || शुभ सकाळ || 🌷


कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे..
🌷 शुभ सकाळ 🌷


Suvichar in Marathi Good Night | सुविचार इन मराठी गुड नाईट

🙂 कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही..! 🙂
💫 शुभ रात्री 💫


🙂 अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालताना सावलीची गरज असते,
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते, आणि
तिच चांगली माणसे आता
माझा शुभसंदेश वाचत आहेत.. 🙂
💤 शुभ राञी 💤


🙂 “आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात,
आणि “प्रेम”
अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही.. 
💫 शुभ रात्री 💫


🙂 ”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी
“कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे
कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी.. 
🌟 शुभ राञी 🌟


सगळी दु:ख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील..
🌟 शुभ रात्री 🌟


Suvichar Marathi Aai Baba | सुविचार इन मराठी आई बाबा

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे,
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात..


आयुष्यात आई आणि वडील
यांना कधीच विसरु नका..


जगात असे एकच न्यायालय आहे,
की तेथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे आईचे प्रेम..


आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात,
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई, वडील, गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं..


संध्याकाळच्या जेवणची
चिंता करते ती “आई”..
आणि आयुष्याभराच्या जेवणाची
चिंता करतात ते “बाबा”..


Suvichar Marathi Abdul Kalam | सुविचार इन मराठी अब्दुल कलाम

स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात,
तर खरे स्वप्न ते असतात जे
पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत..


लहान लक्ष ठेवणे गुन्हा आहे,
महान उद्दिष्टे असली पाहिजे..


आयुष्य खडतर आहे
त्याची सवय करून घ्या..


जीवन एक कठीण खेळ आहे,
आपण केवळ एक व्यक्ती होण्यासाठी
आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता..


जर तुमचा जन्म
पंखानिशी झाला आहे
तर तुम्ही रांगत का आहात
त्या पंखानी उडायला शिका..


संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा
सर्वात महत्वाचा घटक आहे..


God Suvichar in Marathi | गॉड सुविचार इन मराठी

देव कधीच भेटला नाही,
भेटेल की नाही माहित नाही,
पण
देवा सारखी माणसे खूप भेटली
तुमच्यासारखी..


“भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा..”


ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले
तो रांग म्हणजे पांडुरंग..


“देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे,
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..”


“आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव..
पूजावं त्या माऊलीला
तिच्यातच मानाव देव..”