Whatsapp Suvichar Marathi | व्हाट्सएप्प सुविचार मराठी

Whatsapp Suvichar Marathi | व्हाट्सएप्प सुविचार मराठी

जीवन कोणासाठी थांबत नाही
फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात..


जीवन म्हणजे काय ?
कधी स्वत:लाच फोन लाऊन बघा
लागणार नाही,
तो व्यस्त दाखवेल..
जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे
पण स्वत:साठी मात्र
आपण व्यस्त आहोत.


जीवनात एकदा तरी
“वाईट”
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
“चांगल्या”
दिवसांची गरज काळात नाही..


जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि,
उत्तरानाच प्रश्न पडावे
मनालाही समजत नाही मग,
रडत बसावे,
कि हसत रडावे..


जीवन
चांदणं तेच असल तरी
रात्र अगदी नवीन आहे
आयुष्य मात्र एकदाच का ?
हा प्रश्न जरा कठीण आहे..


Whatsapp Status Suvichar Marathi | व्हाट्सएप्प स्टेटस सुविचार मराठी

ठरवलं ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही,
आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच
असही नाही
यालाच कदाचित आयुष्य म्हणतात..


समस्या हि कापसाने भरलेल्या
बागासारखी असते
जे तिच्याकडे फक्त बघतात
त्यांना ती जड वाटते,
पण जे तिला फाटाळतात
त्यांनाच वास्तव कळतं..


देवाने तळहातावर
नशिबाच्या रेष तर
दिल्यात, पण मी
विसरलोय त्याचा रंग
ज्याचा त्यानेच भरायचा
असतो..


जीवनात अडचणी त्यालाच येतात,
जी व्यक्ती
नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते..
आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही
ते जिंकतात किंवा शिकतात…


आयुष्यात आपल्याला कोणाची तरी
सोबत हवी असते,
कधी मैत्री हवी असते,
कधी प्रेम हवे असते,
प्रेमाची साथ कधीही तुटते
पण मैत्री मात्र चिरकालीन असते..


Whatsapp DP Marathi Suvichar | व्हाट्सएप्प डीपी सुविचार मराठी

जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात
“कठीण”
गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल
तर त्याची सुरुवात
“अशक्य”
गोष्टीने होते..


जीवनात वेळ कशी हि असो,
वाईट किवा चांगली
ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत
वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत
लोक सोडून जातील..


आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा
तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते..
आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश
तुमच्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येते..


 जीवन हि एक जबाबदारी आहे,
क्षणाक्षणाला दुसऱ्याला
सांभाळत न्याव लागत..


तुम्ही किती जगता
यापेक्षा कसं जगता
याला जास्त महत्व आहे..


Whatsapp Status Suvichar in Marathi | व्हाट्सएप्प स्टेटस सुविचार इन मराठी

आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते..


जीवन हे
यश आणि अपयश
यांचे मिश्रण आहे..


सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’
म्हणजे “तडजोड”


“जगू शकलात तर चंदनासारखे जगा,
स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या..”


आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका..


Marathi Suvichar For Whatsapp Status | मराठी सुविचार फॉर व्हाट्सएप्प स्टेटस

आयुष्य हे
दुचाकी चालावल्यासारख आहे,
तोल सांभाळण्यासाठी
पुढे जात राहावं लागेल..


आयुष्य हे सर्कस मधल्या
जोकर सारखं झालय,
कितीही दु:खी असेल तरी
जगासमोर हसावच लागतं..


आजचा संघर्ष उद्याचे
सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल..


वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही,
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही..


खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..


Whatsapp Suvichar in Marathi | व्हाट्सएप्प सुविचार इन मराठी

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता..


तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता..


कितीही मोठा पाठिंबा असला तरी,
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते..


स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही
स्वतःचा अपमान करत आहात..


तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या..


Whatsapp Good Morning Suvichar in Marathi |व्हाट्सएप्प गुड मॉर्निंग सुविचार इन मराठी

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल..


जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे..


शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा..


स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते..


रुद्राक्ष असो किंवा माणूस,
खुप अवघड असत एकमुखी भेटणं..


Whatsapp DP Suvichar in Marathi | व्हाट्सएप्प डीपी सुविचार इन मराठी

“नाही”‘
हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे..


मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील..


यशस्वी होण्यासाठी
तुमची यशस्वी होण्याची इच्छा,
अपयशी होण्याच्या
भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे..


छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो..


काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव..


Whatsapp Suvichar Sangrah For Whatsapp | व्हाट्सएप्प सुविचार संग्रह फॉर व्हाट्सएप्प

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा..


स्वप्नं ती नव्हेत
जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की
जी तुम्हाला झोपूच देत नाहीत..


जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही
यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही
पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे..


भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे..


गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं..


Whatsapp Good Night Suvichar in Marathi | व्हाट्सएप्प गुड नाईट सुविचार इन मराठी

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट..


अडचणीत असतांना
अडचणीपासून दूर पळणे,
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत
जाण्यासारखेच आहे..


पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन..


कधी कधी काही
चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ
समजून देतात..


एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा,
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..